ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
मायक्रोसॉफ्टच्या इंटरनेट एक्सप्लोररची सेवा आता 26 वर्षानंतर बंद होणार आहे. मायक्रोसॉफ्टकडून याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की, 16 ऑगस्ट 1995 रोजी इंटरनेट एक्सप्लोररची सेवा सुरू झाली. त्यामुळे इंटरनेटचा वापर कसा करायचा याचे मार्गदर्शन लोकांना होऊ शकले. पहिले दहा वर्षे जगातील 95 टक्के लोक फक्त इंटरनेट एक्सप्लोरर चा वापर करत होते. आता त्याचे युजर्स केवळ 10 टक्केच राहिल्याने कंपनीने हा ब्राऊजर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इंटरनेट एक्सप्लोरर हा ब्राऊझर 15 जून 2022 ला बंद होत आहे. त्याची जागा मायक्रोसॉफ्ट एज घेणार आहे.









