25 टक्क्यापर्यंत ट्राफिक कमी करणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतामधील सेवांची गुणवत्ता कायम राखण्यासाठी दूरसंचार नेटवर्कवरील होणारे ट्राफिकची क्षमता 25 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे व्हिडीओ स्ट्रीमिंग कंपनी नेटफ्लिक्स यांनी मंगळवारी सांगितले आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव आणि त्यामुळे लोकांना घरीच राहावे लागणार आहे. या कारणामुळे लोकांनाचा इंटरनेटचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे अनुमान आहे. ऍमेझॉन प्राईम व्हीडीओ या सारख्या कंपन्या दूरसंचार नेटवर्कवर काम करुन योग्य नियोजन करुन दूरसंचार कंपनी डाटा स्थलातरीत करणार आहे. यात अस्थायी रुपाने बिट दर कमी करण्याचा विचार करत असून लवकरच अमंलात आणणार आहे.
नेटफ्लिक्सचे उपाध्यक्ष केन फ्लोरेंस यांनी एका मेल मध्ये सांगितले आहे, की कोरोनाचे संकट लक्षात घेता, आपली सेवा आणि गुणवत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. नेटफ्लिक्स ट्राफिकला 25 टक्के कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी नवीन योजना तयार करणार असल्याचेही सांगितले आहे.
लवकरच योजना
भारतात आगामी 30 दिवसामध्ये या उपायाची सुरुवात करण्यात येणार आहे. यामुळे कंपनी युरोपप्रमाणे ही उपाययोजना करणार असून जागतिक पातळीवर कंपनी 167 दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक ग्राहक आहेत.









