वार्ताहर / सुळे
श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार इंग्लंडमधून जोपर्यंत भारतात परत येणार नाही तोपर्यंत इंग्लंडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्रात नियोजित क्रिकेट सामने खेळू देणार नाही असा इशारा शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाचे प्रमुख हर्षल सुर्वे यांनी पडळ (ता. पन्हाळा) येथे झालेल्या कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये दिला. अध्यक्षस्थानी संयोजक युवा सेनेचे प्रदीप हांडे होते.
यावेळी हर्षल सुर्वे म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या तलवारीने लढाया करून जुलमी शत्रुचा पराभव केला व रयतेचे स्वराज्य निर्माण केले ती जगदंबा तलवार इंग्लंड येथे राणीच्या वैयक्तिक संग्रहात आहे. रॉयल कलेक्शन ट्रस्टमध्ये सेंट जेम्स पॅलेस येथे ती ठेवण्यात आली आहे. ती तलवार भारतात परत आणणे आवश्यक आहे. यासाठी व्यापक लोकचळवळ उभी करण्यासाठी प्रत्येक भागात बैठका घेऊन चळवळ ऊभी केली जाईल. यावेळी प्रदीप हांडे म्हणाले. जगदंबा तलवार ही देशाची आस्मिता आहे.हि जगदंबा तलवार लवकर भारतात परत आणण्यासाठी देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांना शिवभक्तांकडून लाखो पोस्टकार्डस पाठवावीत.
यावेळी प्रदीप हांडे, कृष्णात जगताप, प्रमोद नाईक, किरण रामाणे, गणेश पांडव, किरण पोवार, संदिप रामाणे, आकाश शिंदे, सुरज शेळके, निलेश मिसाळ व परिसरातील शिवभक्त उपस्थित होते.
तलवारीचा इतिहास इसवी सन 1875 -76 च्या आसपास कोल्हापुरच्या गादीवर अवघ्या अकरा वर्षाचे चौथे शिवाजी राज्य करत होते. इंग्लडचा तत्कालिन प्रिन्स ऑफ वेल्स भारत भेटीवर आले असताना त्यांनी दिवाण माधव बर्वे यांच्या मदतीने हि जगदंबा तलवार इंग्लडला नेली. |