वृत्तसंस्था/ मॅटेला
इंग्लंडचा क्रिकेट संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी रविवारी श्रीलंकेत पुन्हा दाखल झाला आहे,. ही मालिका गेल्या मार्चमध्ये कोरोना महामारीमुळे तहकूब करण्यात आली होती.
ब्रिटीश हवाईदलाच्या चार्टर विमानाने इंग्लंडचा संघ रविवारी श्रीलंकेत दाखल झाला. राजपक्षे विमानतळावर इंग्लंड संघाचे आगमन झाल्यानंतर काही वेळातच या संघाला थेट हॉटेलकडे नेण्यात आले. या संघासाठी कोरोनाच्या नियमावलीची अंमलबाजावणी केली जाणार आहे. रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ या दौऱयात लंकेविरूद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी गॅलेच्या स्टेडियमवर 14 जानेवारीपासून सुरू होईल.









