लंडन
50 हून अधिक कॅन्सरच्या प्रकारांचा शोध घेणारी महत्त्वाकांक्षी अशी गॅल्लेरी टेस्टची मोहीम येत्या सोमवारपासून इंग्लंडमध्ये राबवली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. कॅन्सर किंवा कर्करोगासंबंधीची पूर्वकल्पना देणारी ही चाचणी महत्त्वाची माहिती पुढे आणू शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
कर्करोगाच्या पेशींचा शोध रुग्णाच्या रक्त तपासणीत डीएनएमार्फत समजून घेण्याची ही महत्वपूर्ण अशी चाचणी आहे. ब्रिटनमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिस विभागाद्वारे सोमवारपासून ग्रेल इंकच्या अंतर्गत गॅल्लेरी रक्त चाचणी मोहीम सुरू होत आहे. यातून 50 प्रकारच्या कॅन्सरनिगडीत लक्षणांचा अभ्यास केला जाणार आहे. याकरीता 1 लाख 40 हजार स्वयंसेवकांची नियुक्ती होणार असल्याचे समजते. कॅन्सरची लक्षणे लवकरात लवकर कळावी याकरीता ही चाचणी महत्त्वाची ठरणार आहे. आजघडीला कर्करोगाचे वाढते प्रमाण सर्वच देशांसाठी डोकेदुखीचं ठरलेलं असून त्यासंबंधातील ताज्या चाचणीतून नवी माहिती समोर येऊ शकेल.









