वृत्तसंस्था/ कोलंबो
इंग्लंडचा संघ श्रीलंकेत कसोटी मालिका खेळण्यासाठी दाखल झाला आहे. उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. इंग्लंड संघातील अष्टपैलू मोईन अली कोरोना बाधित ठरला असून त्याला 10 दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे.
लंकेत इंग्लंडचा संघ दाखल झाल्यानंतर या संघातील खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये मोईन अली पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. उभय संघातील कसोटी मालिकेला 14 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे.









