मालवण/प्रतिनिधी
कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मालवण नगरपरिषदेसाठी पुन्हा एकदा १ कोटी ४० लाख रु. चा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून मालवण शहरातील अनेक विकास कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. महेश कांदळगावकर, भाई गोवेकर, बबन शिंदे, हरी खोबरेकर, मंदार केणी, यतीन खोत, गणेश कुडाळकर, बाबी जोगी, पंकज सादये, मंदार ओरोसकर, नरेश हुले, अमेय देसाई, सेजल परब, तृप्ती मयेकर, सुनीता जाधव, शिला गिरकर, दर्शना कासवकर, आकांक्षा शिरपुटे इतर शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व मालवण वासियांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे शहरातील विकास कामांना निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. मालवण शहरातील विकास कामांना निधी मंजुरीचा शासन निर्णय ०१ फेब्रुवारी २०२२ रोजी निर्गमित करण्यात आला असून आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.









