सांगरूळ / प्रतिनिधी
शिक्षक आमदार म्हणून प्राध्यापक जयंत आसगावकर यांनी शिक्षण संस्था, शिक्षक व कर्मचारी यांचे प्रश्न निश्चितपणे सोडवावेत .त्याला आमचे निश्चितपणे पाठबळ असेल . पण ग्रामीण भागातील शाळांची गुणवत्ता वाढण्यासाठी शाळांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात .
सध्याच्या स्पर्धेच्या युगाला सामोरी जाणारी सक्षम नवी पिढी घडवण्यासाठी ग्रामीण भागातील शिक्षणाला पाठबळ द्या .निवडणुकीत जसा इतिहास घडवला तसाच चांगली कामगिरी करणारा शिक्षक आमदार म्हणून नवा इतिहास घडवा . असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले .
सांगरुळ गावचे सुपुत्र व सांगरुळ शिक्षण संस्थेचे सचिव प्राध्यापक जयंत आसगावकर यांची पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून आमदारपदी निवड झाल्याबद्दल सांगरूळ येथे आयोजित नागरी सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगरुळ शिक्षण संस्थेचे संचालक निवृत्ती चाबूक होते.
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी यापूर्वी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद निवडणूक झालेली समजत नव्हती पण पक्षीय पातळीवर महाविकास आघाडीच्या वतीने प्रथमच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाआणि एक वेगळा रंग आली निवडणूक महा विकास आघाडीतील नेते आणि कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या एकसंघ प्रामाणिक प्रयत्नामुळे जिंकता आली .शिक्षक मतदारसंघात तर एवढ्या मोठ्या मताधिक्याने यापूर्वी कधीच उमेदार विषय झाला नाही .प्राध्यापक आसगावकर यांनी शिक्षक मतदारसंघातून मोठ्या फरकाने निवडणूक जिंकून इतिहास निर्माण केला आहे . कोल्हापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत दैदीप्यमान प्रगती करत शिक्षक आमदार म्हणून केलेल्या कामाचा ही नवा इतिहास घडवावा अशी अपेक्षा नामदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीराज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सहापैकी पाच जागा जिंकत आपली ताकद दाखवून दिली आहे .पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून प्राध्यापक जयंत आसगावकर यांनी मिळवलेला विजय हा महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नाचे फळ आहे .कोरोना महामारीमुळे राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या अडचणीत होते .सध्या राज्याची आर्थिक स्थिती सुधारत असून महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता सरकार निश्चितपणे करेल याची ग्वाही नामदार मुश्रीफ यांनी यावेळी दिली .
यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व करवीरचे आमदार पी एन पाटील यांनी प्रा . जयंत आसगावकर यांनी कधीही कोणाशीही शत्रुत्व केले नाही .सर्वांशी गोड बोलुन काम करणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे .स्वर्गीय डी डी आसगावकर यांनी स्वर्गीय श्रीपतरावजी बोंद्रे व त्यांच्यानंतर आपल्या सोबत काँग्रेस पक्षाची विचारधारा म्हणून सातत्याने काम केले आहे . त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा जपत जयंत आसगावकर यांनीही सातत्याने काँग्रेस पक्षाचे काम केले आहे .स्व डी डी आसगावकर यांच्या पश्चात सांगरुळ शिक्षण संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळत संस्थेची चौफेर प्रगती केली आहे .त्यांच्या विजयासाठी मतदार संघातील सर्व काँग्रेसच्या नेते मंडळींना विनंती केली .त्यांच्या रूपाने घरचा आमदार करायला मिळाला ही समाधानाची बाब असल्याचे सांगितले . कोल्हापूर शहरचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी महाविकास आघाडीच्या सरकारची चांगले काम पाहूनच शिक्षक व पदवीधर मतदार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून दिले आहे .प्राध्यापक आसगावकर यांच्या रूपाने कोल्हापूर जिल्ह्याला आणखी एक आमदार मिळाला असून त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर ते शिक्षक आमदार म्हणून प्रभावी काम करतील असा विश्वास व्यक्त केला .
सत्कारा बद्दल कृतज्ञता व्यक्त करताना आमदार जयंत आसगावकर यांनी स्व.गुरुवर्य डी डी आसगावकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील चळवळीचा वारसा जपत वाटचाल केली असून पक्षावर निष्ठा ठेवून काम केल्यामुळे एवढे मोठे पदाने माझा सन्मान झाला केला आहे .काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना व मित्र पक्षाच्या सर्वच नेत्यांनी तसेच विभागातील मोठ्या संस्था चालका बरोबरच छोट्या संस्थाचालकांनीही ताकतीने काम केल्यामुळे मोठा विजय मिळवता आला आहे .सांगरुळ गावच्या ग्रामस्था बरोबरच परिसरातील ग्रामस्थांचे आशीर्वाद मिळाले आहेत .या सर्वांची जाणीव ठेवून भविष्यात उल्लेखनीय काम करण्याची ग्वाही आमदार आसगावकर यांनी यावेळी दिली .
यावेळी बोलताना गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी सांगरूळचा आमदार करण्याचे सांगरुळच्या जनतेचे स्वप्न प्रा जयंत आसगावकर यांना आमदार करून महाविकास आघाडीच्या नेत्यानी पूर्ण केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले .
सुरुवातीस स्वागत सरपंच सदाशिव खाडे यांनी केले . प्रस्ताविक खंडोबा दूध संस्थेचे संस्थापक व कोजिमाशि शिक्षक पत संस्थेचे माजी चेअरमन भगवान लोंढे यांनी केले . यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. सुरेश कुऱ्हाडे , जि प अध्यक्ष बजरंग पाटील , गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे ,कुंभीचे व्हा. चेअरमन निवास वातकर ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तौशिफ मुल्लाणी गोकुळचे संचालक विश्वास पाटील,जिप सदस्य सुभाष सातपुते यशवंत बँकेचे चेअरमन एकनाथ पाटील,व्हा.चेअरमन हिंदुराव तोडकर,अनिल पाटील,पुंडलिक पाटील,इंदुबाई आसगावकर
अध्यक्ष य .ल खाडे, उपाध्यक्ष के ना जाधव यांचेसह संस्थेचे सर्व संचालक उपसरपंच सुशांत नाळे यांचेसह सांगरुळ परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते .आभार विलास नाळे यांनी मानले सूत्रसंचालन सीमा मकोटे यांनी केले .