प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ. दीपक जोशी यांची माहिती, मा. ना. जोशी फौंडेशन, नॉर्थ स्टार हॉस्पिटलतर्फे आयोजन
प्रतिनिधी/कोल्हापूर
बदलत निघालेली जीवनशैली, ताणतणाव, आहारामधील अनियमितता यामुळे वाढते वजन, गुडघेदुखी, मधुमेह, रक्तदाब अशा आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये योग्य, संतुलित आहाराबाबत जनजागृती करण्यासाठी (कै.) मा. ना. जोशी फाऊंडेशन आणि नॉर्थस्टार सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या व्याख्यानाचे मोफत आयोजन केल्याची माहिती नॉर्थस्टार सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक आणि प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. जोशी म्हणाले, मधुमेह, रक्तदाब अशा आजारांपासून नागरिकांन दूर ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये आहार पद्धतीबाबत जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. मंगळवार 28 रोजी केशवराव भोसले नाटय़गृह येथे सायंकाळी 6 वाजता व्याख्यानास सुरवात होईल. कोरोना प्रतिबंध नियमांचे पालन करत व्याख्यान होईल. सर्वांना व्याख्यानासाठी मोफत प्रवेश असेल. कार्यक्रमासाठी प्रवेशिका बंधनकारक असणार आहे. व्याख्याना दिवशी संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृह येथे प्रवेशिका उपलब्ध असणार असल्याचेही डॉ. जोशी यांनी सांगितले.
फाऊंडेशन आणि हॉस्पिटलतर्फे वर्षभर राबविण्यात येणाऱया उपक्रमांची माहिती देताना ड. जोशी म्हणाले, प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही 1 ते 26 जानेवारी दरम्यान गुडघ्याच्या कृत्रिम सांधेरोपण शिबिर होईल. सुमारे दिड लाख रुपये खर्च असणारी हि शस्त्रक्रीया शिबिरामध्ये 99 हजार रुपयांमध्ये होईल. शिबिरातंर्गत सुमारे 400 रुग्णांची शस्त्रक्रीया केली असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले. तसेच हॉस्पिटलमध्ये प्रत्येक महिन्याच्या तिसऱया रविवारी मोफत रुग्ण तपासणी शिबिर होत असल्याची माहितीही त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला डॉ. सोनिया आजरेकर, योगेश लखन, समीर सावनुरे आदी उपस्थित होते.
आजी-माजी सैनिकांसाठी जयजवान योजना
हॉस्पिटलमध्य आजी-माजी सैनिकांसाठी जयजवान योजन आहे. यामध्ये आजी-माजी सैनिक, त्यांचे कुटुंबिय यांना कन्सलटींग, एक्स-रे आणि उपचार आदी सुविधा मोफत आहेत. तर शस्त्रक्रीया माफक दरात केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
दर महिन्याला 2 ते 3 रुग्णांची मोफत शस्त्रक्रीया
प्रत्येक महिन्याला दारिद्र रेषेखालील दोन ते तीन रुग्णांवर मोफत शस्त्रक्रीया केली जाते. गेली चार वर्ष हॉस्पिटलकडून हा उपक्रम सुरु आहे.
एलईडी स्क्रीन, सोशल मीडियावरुन प्रसारण
डॉ. दिक्षित यांच्या व्याख्यानाला होणारी गर्दी आणि कोरोना पार्श्वभूमीवर मर्यादित आसन क्षमता लक्षात घेता नाटय़गृहाबाहेर एलईडी स्क्रीनवरुन तसेच फेसबुक, युटय़ुबच्या माध्यमातून व्याख्यानाचे प्रसारण करण्याचे नियोजन केले आहे.
शुगर तपासणी केवळ 200 रुपयांमध्ये
नॉर्थ स्टार हॉस्पिटल येथे प्रवेशिका घेतेवेळी सीबीसी, एचबीएवनसी आणि शुगर तपासणी केवळ दोनशे रुपयांमध्ये हाईल. तसेच तपासणी केलेल्या रुग्णांना काही शंका असल्यास त्यांना व्याख्यान्या दरम्यान डॉ. दीक्षित यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.









