वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
आसुस कंपनीचा आरओजी फोन 3 कंपनीने नवीन गेमिंग स्मार्टफोनच्या पातळीवर सादरीकरण केले आहे. या नवीन फोनचे डायमेंशनबाबत मागील वर्षात आरओजी फोन 2 यासारखाच असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. परंतु यामध्ये हार्डवेअरच्या पातळीवर विविध बदल करण्यात आले आहेत.
आसुस आरओजी फोन 3 क्वालकॉम स्नॅपड्रगन 865Ù प्रोसेसरवर काम करत आहे. आणि यामध्ये एक सीडिजाईन कॉपर 3 डी वेपार चेंबरसोबत गेमकूल 3 हीट डिसिपेटिंग सिस्टम आणि उपलब्ध मॉडेलच्या तुलनेत ग्रेफाइट फ्लिम मिळत असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
विशेष फिचर
…गेमिंग फोनमध्ये एअरट्रिगर 3 अल्ट्रासोनिक बटन असून यामध्ये डबल फ्रन्ट फायरिंग स्पीकरची सुविधा
…आरओजी फोन 3 एक क्लिप ऑन एअरऍटिव्ह कूलर 3 ऍक्सेसरीसोबत सादरीकरण असल्याने तापमानला 4 डिग्री सेल्सियसवर काम करते.
……आसुस आरओजी फोनमध्ये 8 जीबी रॅमÙ128 जीबी स्टोरेज मॉडेलची किमत 49,999 असून 12 जीबी रॅमÙ265जीबी स्टोरेजच्या मॉडेलची किमत 57,999 रुपये राहणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.









