ऑनलाईन टीम / इटानगर :
मणिपूरमध्ये कर्नलच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेत आसाम रायफल्सच्या जवानांनी आज अरुणाचल प्रदेशमध्ये नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालिमच्या तीन माओवाद्यांना कंठस्नान घातलं. ठार झालेल्या माओवाद्यांकडून मोठय़ा प्रमाणात शस्त्रासाठा जप्त करण्यात आला आहे.
शनिवारी सकाळी मणिपूरच्या चुराचंदपूरमध्ये म्यानमार सीमेजवळ 46 आसाम रायफल्सच्या ताफ्यावर माओवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात कर्नल, त्यांची पत्नी, मुलगा, ड्रायव्हर आणि पाच जवानांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्य दल आणि निमलष्करी दल दहशतवाद्यांच्या मागावर आहेत. आज याच हल्ल्याचा बदला घेत आसाम रायफल्सच्या जवानांनी आज अरुणाचल प्रदेशमध्ये नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालिमच्या तीन माओवाद्यांना कंठस्नान घातलं. या माओवाद्यांनी दोन नागरिकांचे अपहरण करुन म्यानमारला नेलं आहे. त्या नागरिकांचा शोध सध्या सुरू आहे.









