ऑनलाईन टीम / दिसपूर :
आसाममधील सोनितपूर येथे रविवारी दुपारी २.२३ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.१ रिश्टर स्केल एवढी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने ही माहिती दिली. मात्र, भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा मालमत्तेची हानी झाल्याची नोंद नाही.









