कन्नूर : भारत वैविध्याने नटलेला देश असून हेच याचे सर्वात मोठे वैशिष्टय़ आहे. या वैविध्याचे उत्तम उदाहरण दिसून आले आहे. ईशान्येतील एका राज्याची रहिवासी असलेल्या युवतीने दक्षिणेच्या केरळमधील व्यक्तीशी विवाह केला आहे. ही युवती आता अत्यंत वेगळी संस्कृती असेल्या स्वतःच्या नव्या राज्यातील निवडणुकीत उभी राहिली आहे.
आसामच्या लखीमपूरची रहिवासी असलेल्या मुनमीने कन्नूर जिल्हय़ाच्या इरित्ती गावातील रहिवाशासोबत विवाह केला आहे. मुनमी आता भाजपच्या वतीने स्थानिक निवडणूक लढवत आहे. गावातील लोकांनी मला स्वतःचा कुटुंबीय म्हणून स्वीकारल्याचे मुनमीने म्हटले आहे.









