आष्टा/प्रतिनिधी
आजारास कंटाळून आष्टा येथील शशिकांत उर्फ पोपट रामचंद्र कांबळे याने स्वतःच्या आईचा खून करून आत्महत्या केली. या घटनेने आष्टा शहरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.
शशिकांत उर्फ पोपट रामचंद्र कांबळे वय 49 असे मुलाचे नाव असून श्रीमती रतन रामचंद्र कांबळे वय ७५, राहणार दत्तवसाहत आष्टा असे खून झालेल्या मातेचे नाव आहे.
शशिकांत कांबळे हे आपली आई व पत्नीसह दत्तवसाहत मध्ये राहत होते. त्यांना दम्याचा त्रास होता. मानसिक आजारातून आणि आपल्या नंतर आईचे काय होणार या विचारातून त्यांनी आईचा खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली.








