पती-पत्नी जखमी, घराचे मोठे नुकसान
आष्टा / वार्ताहर
आष्टा येथे घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस गळती होऊन झालेल्या अपघातात पती-पत्नी जखमी झाले. तसेच घराचे ही मोठे नुकसान झाले. शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास दुर्घटना घडली.
अरुण गिराप्पा हिंगणगावे(वय६२), सौ. शोभा अरुण हिंगणगावे(वय ५८) अशी या घटनेत जखमी झालेल्या पती-पत्नींची नावे आहेत.आष्टा येथील कदम वेसमध्ये अरुण हिंगणगावे यांचे घर आहे. शनिवारी पहाटे हिंगणगावे यांच्या घरी घरगुती गॅस सिलेंडरची गळती झाली होती. अरुण हिंगणगावे हे पहाटे उठल्यानंतर किचनमध्ये गेले असता गॅसगळतीमुळे घरात अचानक आग लागली आणि मोठा स्फोट झाला. घरातील टीव्ही,सोफासेट यासह प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले.