कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाऊन जारी केला आहे. लॉकडाऊनमुळे देशभरातील लोक आता आपल्या घरातच कैद झाले आहेत. मालिकांचे चित्रीकरण बंद असल्यामुळे सर्व कलाकार देखील घरीच राहून आपला वेळ घालवत आहेत. हे कलाकार घरी आपल्या वेळ कसा घालवत आहेत हे जाणून घ्यायची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेमुळे घराघरात बबडय़ा म्हणजेच सोहम या व्यक्तिरेखेची चर्चा असून, या व्यक्तिरेखेमुळे अभिनेता आशुतोष पत्की याचा एक मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. बबडय़ा म्हणजेच आशुतोष त्याचा वेळ घरी कसा घालवतो याबद्दल बोलताना तो म्हणाला, हा 21 दिवसांचा लॉकडाऊन म्हणजे सरकारने आपल्या सेफ्टीसाठी घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे आपण घरी राहून त्यांना सहकार्य करायला पाहिजे. मी घरी माझा वेळ माझ्या घरच्यांसोबत घालवतोय. या मोकळय़ा वेळात मी अनेक गोष्टी शिकायचा प्रयत्न करतोय. सध्या मी कूकिंग शिकतोय. वेगवेगळय़ा रेसिपीज मी ट्राय करतोय. घरच्यांना त्यांच्या कामात मदत करतोय, स्वत:च्या हेल्थकडे लक्ष देतोय. या वेळेत आपण अनेक छान वेब सिरीज किंवा चित्रपट बघू शकतो. मी रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चित्रपट बघतो. हे माझं क्वारंटाईनचं शेडय़ुल बनलंय, असे तो म्हणाला.
Previous Articleआजचे भविष्य शनिवार दि. 18 एप्रिल 2020
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









