कोलंबो : 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान होणाऱया आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद लंका भूषविणार असल्याची घोषणा शनिवारी अशिया क्रिकेट मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी केली.
आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत यजमान लंका, भारत, पाक, अफगाण आणि बांगलादेश या पाच संघांचा समावेश असून सहावा संघ पात्रता फेरीनंतर निश्चित होईल. पात्रता फेरीची स्पर्धा 20 ऑगस्टला होणार आहे. यापूर्वी म्हणजे 2018 साली ही स्पर्धा खेळविल गेली होती आणि भारताने विजेतेपद पटकाविले होते.
2020 आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद लंकेला मिळाले होते. पण, कोरोनामुळे ही स्पर्धा दोनवेळा लांबणीवर टाकण्यात आली होती. या स्पर्धेसाठी सहभागी होणाऱया सहाव्या संघासाठी पात्रतेच्या स्पर्धेमध्ये संयुक्त अरब अमिरात, कुव्हेत, सिंगापूर आणि हाँगकाँग यांचा समावेश राहील. ही पात्रतेची स्पर्धा 20 ऑगस्टपासून खेळविली जाईल.









