ऑनलाईन टीम / मुंबई :
विद्यापीठांची जागतिक क्रमवारी निश्चित करणाऱ्या ‘टाइम्स हायर एज्युकेशन’ या संस्थेच्या आशिया खंडातील विद्यापीठांच्या क्रमवारीच्या पाहिल्या शंभरात भारतातील आठ शिक्षणसंस्थांचा समावेश झाला आहे.
बेंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही संस्था यंदाही देशात अव्वल ठरली आहे. तिचे 36 वे स्थान आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या संस्थेचे स्थान घसरले आहे. पहिल्यांदाच या क्रमवारीत सहभागी झालेली आयआटी ही संस्था 47 व्या क्रमांकावर आहे. आशिया खंडातील 489 संस्था या क्रमवारीत सहभागी झाल्या होत्या.









