जिल्हा आशा वर्कर्स युनियनची माहिती
प्रतिनिधी / कणकवली:
सीटूच्या राज्य कमिटीच्या व महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या आदेशानुसार 21 एप्रिल रोजी आशा व गटप्रवर्तक आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा उपकेंद्रात, लसीकरण सत्रादरम्यान, सर्वेक्षण करताना आशाताई गटप्रवर्तक निषेध दिन पाळणार असल्याची माहिती जिल्हा आशा वर्कर्स युनियन सीटू संलग्नतर्फे देण्यात आली.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सीटूच्या राज्य कमिटीच्या व महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या आदेशानुसार ज्या उपकेंद्रात केवळ एक किंवा दोन आशा आहेत, त्यांनी आपल्या कुटुंबाच्या सोबतीने हा निषेध दिन साजरा करावा. आरोग्य विभागातील इतर कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी होत असतील, तर त्यांनाही घेऊन हा निषेध दिन साजरा करण्याचा निर्णय सीटूने घेतला आहे. तसेच शक्मय झाल्यास काळी रिबीन दंडास लावूनही निषेध करावा.
मात्र, हा निषेध दिन पाळताना आशा व गटप्रवर्तक यांनी पुढील सूचनांचे पालन करावे. आशा व गटप्रवर्तक असे पाचजण एकत्रित येऊन, आपल्यात एक मीटरचे अंतर ठेवूनच निषेधाचा फलक हातात धरावा, घोषणा देणे शक्मय असेल, तर द्याव्यात, पण कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर येऊ नये, पाचपेक्षा जास्तजणांनी एकत्रित येऊ नये, सध्या जमावबंदी कायदा लागू असल्याने याची दक्षता घ्यावी. आपल्या तालुक्मयातील प्रत्येक उपकेंद्रातून हा कार्यक्रम होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावेत. भाषण नको, रेशन द्या, वेतन द्या, आशा व सर्व आरोग्य कर्मचाऱयांना पुरेशा सुरक्षा साधनांची व्यवस्था करा, आशांना कोरोना सर्वेक्षणासाठी किमान 100 रुपये प्र्रतिदिनी मोबदला द्या, स्थलांतरित कामगारांना अन्न व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करा, आयकर न देणाऱया सर्व कुटुंबांना तातडीने 3 महिन्यापर्यंत मासिक किमान 7500 रुपये रोख रक्कम थेट हस्तांतरित करा आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. या मागण्यांची पूर्तता न झाल्यानेच हा निषेध दिन पाळण्यात येत असल्याचे आशा वर्कर्स युनियन सीटूने स्पष्ट केले आहे.









