प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव येथे अनेक वर्षे वास्तव्यास असलेल्या व सध्या पुणे येथे राहणाऱया आशा मनोहर (वय 90) यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, दोन मुली, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे. जेष्ठ साहित्यिक अनंत मनोहर यांच्या त्या पत्नी होत.
आशा मनोहर यांचा बेळगावातील सांस्कृतिक संस्थांशी घनिष्ठ संबंध होता. हिंदवाडी महिलामंडळ, मंथन व जय भवानी सोसायटीचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले होते.









