संघटनेचे राज्य महासचिव सलीम पटेल यांचे आवाहन, जिल्हा आशा वर्कर्स, गटप्रवर्तक युनियनचा मेळावा
प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यातील आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांचे योगदान महत्वपुर्ण आहे. पण विविध शासकीय योजनांचा ताण पाहता मर्यादित गटप्रवर्तकांची केंडी होत आहे. त्यामुळे आपले प्रश्न सोडवण्यासाठी गटप्रवर्तकांनी संघटीत व्हावे, असे आवाहन आशा वर्कर्स, गटप्रवर्तक संघटनेचे राज्य महासचिव सलीम पटेल यांनी केले.
शाहूपुरीतील जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या हॉलमध्ये रविवारी जिल्हा आशा वर्कर्स, गटप्रवर्तक युनियनचा जिल्हा मेळावा झाला. मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा नेत्रदीपा पाटील होत्या. यावेळी कॉ. चंद्रकांत यादव, युवराज पाटील, भरमा कांबळे, शिवाजी मगदूम, उज्वला पाटील, जिल्हा परिषद सदस्या सारीका पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
नेत्रदीपा पाटील म्हणाल्या, आशा वर्कर्स संघटीत असल्याने त्यांचे प्रश्न सुटले आहेत. पण त्यांच्यासोबत कार्यरत गट प्रवर्तकांचे प्रश्न कायम आहेत. आशा गट प्रवर्तकांनी संघटीत होणे आवश्यक आहे. शासन धोरण काय आहे, हे पाहून त्यांनी प्रश्नांसाठी लढÎाची तयारी ठेवावी, असे आवाहन केले.
मेळाव्याचे उद्घाटन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून झाले. मेळाव्यात कॉ. चंदकांत यादव, शिवाजी मगदुम, भरमा कांबळे, युवराज पाटील यांनी मार्गदर्शन केले. गटप्रवर्तक अनुजा पाटील, नंदिनी करंबे, सारिका पाटील, आशा माने, माळी यांची प्रश्न मांडले. उज्वला पाटील यांनी स्वागत करून आभार मानले. जिल्हÎातील सत्तरहून अधिक गटप्रवर्तक उपस्थित होत्या.