प्रतिनिधी/ खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील आवाशीनजीक टँकरने पादचारी युवकाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी 2 च्या सुमारास घडली. अभिजित पवार (रा. चिंचवली-खेड) असे मृत युवकाचे नाव आहे.
हा टॅंकर हिंदुस्थान युनिलिव्हर या कारखान्यात कच्चा माल घेऊन आला. टँकरमध्ये क्लिनर नसल्याने त्याला टँकरच्या डाव्या बाजूने चालत असलेला पादचारी अभिजित पवार हा दिसला नाही. टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खेड पोलीस अधिक तपास करत आहेत.









