वारणानगर / प्रतिनिधी
आवळी (ता.पन्हाळा) येथे विवाहित महिलेशी गैरवर्तन केल्याचा प्रकार पुढे आला आहे. याबाबत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून दिलीप निवृत्ती पाटील याच्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडित महिलेने कोडोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
या बाबत कोडोली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पीडित महिला ही विवाहित असून, पीडित महिला व आरोपी एकाच गल्लीत रहात आहेत. गेली एक वर्ष पीडित महिला व दिलीप यांच्यात शेतीच्या कामाचा पैरा असल्याने त्यांचे एकमेकांच्या घराकडे येणे जाणे असल्याने त्यांच्यात चांगलीच ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेऊन गेली काही दिवस दिलीप तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत पाठलाग करत होता. रविवार दि.१ रोजी रात्री ९.३० वाजता पीडित महिला वापा नावाच्या जनावराच्या शेड मधील जनावरांना वैरण टाकून बाहेर आल्यावर दिलीप याने हाथ धरून मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले म्हणून पीडित विवाहित महिलेने विनय भंगाची फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास कोडोली पोलिस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल कोळेकर करत आहेत.
Previous Articleघरकुलाचा हप्ता काढण्यासाठी अठराशेची लाच घेताना अभियांत्रिकी सहाय्यक सुहास शिंदे जाळ्यात
Next Article बेळगाव जिह्यात सोमवारी 38 जणांना कोरोनाची बाधा









