वारणानगर / प्रतिनिधी
विवाहीत महिलेचा चारित्र्यांच्या संशयावरुन प्रियकरानेच गळा आवळून खून करून तिला गावविहरीत टाकून दिल्याचे आज गुरुवारी पोलीस तपासात उघड झाले असून यातील आरोपी प्रियकर नागेश बाबासो पाटील वय ३२ यास कोडोली पोलीसांनी अटक केली आहे. आवळी ता. पन्हाळा येथे बुधवार ४ रोजी ही खूनाची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती सविता संजय पाटील वय २५ असे या मृत विवाहितेचे नांव आहे.
बुधवार दि. ४ रोजी सविता हिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला याबाबत पोलीस बाराच्या सुमारास घटनास्थळी पोहचले प्राथमिक स्तरावर सविता हिने आत्महत्या केल्याचा अंदाज होता परंतु शवविच्छेदनात तिचा गळा आवळून खून केल्याचे निष्पण्ण झाले होते. तसेच विहरीत टाकतेवेळी डोक्यात मोठा घाव बसल्याचे तसेच मारहाणीने मृत्यू झाल्याचे निष्पण्ण झाल्यावर सविताची आत्महत्या नसून खून झाल्याचे उघड झाल्याने पोलीस तर चक्रावून गेले होते. या प्रकाराने आवळीसह परिसरात एकच खळबळ उडाली होती.
सविता हि सोमवार पासून बेपत्ता होती ती बेपत्ता झाले पासून अठरा तासानी पती संजय गणपती पाटील याने कोडोली पोलीसात मंगळवार दि. ३ रोजी दुपारी ती बेपत्ता झाल्याची वर्दी दिली होती.
कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे या घटनेची माहिती मिळाल्यापासून मृत सविताची उत्तरीय तपासणी होऊन अत्यसंस्कार करेपर्यन्त आवळी येथे पोलीस ताप्यासह तळ ठोकून होते रात्री उशीरा पर्यन्त सविताला कोणी कशासाठी मारले याचा कोणताच सूराग लागला नाही किंवा कोणावर संशय देखील व्यक्त करण्यात आलेला नव्हता.
याप्रकरणी पती, प्रियकर यासह प्राथमिक स्थरावर चार एक व्यक्तीवर संशय व्यक्त केला जात होता. बुधवारी रात्री उशीरा आवळीच्या पोलीस पाटील यानी पती संजय पाटील यांच्या विरोधात फिर्याद दिल्यावर चारीत्र्यांच्या संशयावरून पती संजय याचेवर खूनाचा गुन्हा नोंदवण्यात येवून त्याला ताब्यात देखील घेतले होते.
आज गुरुवारी शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधिक्षक अनिल कदम यानी घटनास्थळी भेट देत चार संशयीत, पती प्रियकर यांना ताब्यात घेत तपासाला गती दिली तपासात पतीचा सहभाग नसल्याचे तसेच अन्य संशयीतांचा देखील फारसा सहभाग नसल्याचे आढळले प्रियकराला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने दुपारी सविताच्या खूनाची कबूली दिल्यावर पोलीसांनी त्यास अटक केली. या वेळी अखेर सविताचा नागेशने गळा आवळून खून केला अशी कबूली दिली आहे.
शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधिक्षक अनिल कदम व त्याचे पोलीस कर्मचारी कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे व पोलीस कर्मचारी यानी घटना उघडकीस आले पासून चोवीस तासाच्या आतच खून्याला जेरबंद करण्यास विशेष परिश्रम घेतले असून सहा पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे तपास करीत आहेत.









