आळसंद /वार्ताहर
खानापूर तालुक्यातील आळसंदसह परिसरातील 15 गावांच्या दृष्टीने सोयीचे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय सेवेस नुकतीच सुरुवात झाली. यासाठी आळसंदच्या विद्यमान सरपंच इंदूमती जाधव व माजी उपसरपंच नितीनराजे जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर दहा वर्षानंतर या आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लागला असून प्रत्यक्ष रुग्णांना सेवा देण्यास प्रारंभ करण्यात आला.
या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शुभारंभासाठी आळसंद व परिसरातील 15 गावच्या आजी व माजी सरपंचाना निमंत्रित करण्यात आले होते.यावेळी भाळवणीचे विद्यमान सरपंच .विमल माळी व माजी सरपंच सयाजी धनवडे, बलवडीचे विद्यमान सरपंच प्रविण पवार व माजी सरपंच रघुनाथ पवार, जाधवनगरच्या सरपंच सारिका जाधव व उपसरपंच रेखा जाधव, कमळापूरच्या विद्यमान सरपंच प्रमिला जयकर साळुंखे व माजी सरपंच अरविंद साळुंखे, वाझरच्या माजी सरपंच संगिता सुतार, ढवळेश्वरच्या माजी सरपंच मनिषा शिंदे, कार्वेचे विद्यमान उपसरपंच विक्रम जाधव व माजी सरपंच बाबासो जाधव, मंगरुळचे विद्यमान सरपंच पोपट शिंदे व माजी सरपंच रंगराव लोखंडे, खंबाळेच्या माजी सरपंच सुनंदा सुर्वे, तसेच वैद्यकीय अधिकारी डाॅ.अशोक लवटे, डाॅ.प्रियांका जाधव,आरोग्य अधिकारी व सेवक उपस्थित होते.सर्व उपस्थित मान्यवरांचा आळसंद ग्रा.पं.सदस्यांच्यावतीने यावेळी सत्कार करण्यात आला.
विटा येथून आळसंद येथे स्थलांतरित करण्यात अालेले प्राथमिक केंद्रासाठी आळसंद ग्रामपंचायतच्यावतीने तात्पुरत्या स्वरुपात 4 खोल्या उपलब्ध करुन देण्यात आल्या असून त्या ठिकाणी विटा प्राथमिक आरोग्य केंद्राकडील बाह्य रुग्ण तपासणी, स्री रुग्ण तपासणी केली जाणार आहे. प्रसूतीसाठी आळसंद येथील अारोग्य उपकेंद्रातील प्रसूती कक्षाचा वापर केला जाणार आहे.तसेच कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेकरिता आळसंद येथे आॅपरेशन थिऐटर उपलब्ध होईपर्यंत विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
यावेळी ग्रा.प.सदस्या सिंधूताई जाधव, संगिता जाधव, स्वाती हारुगडे, सिमा शिरतोडे, मंजुळा जाधव,ग्रा.प.सदस्य भरत हारुगडे, संदिप बनसोडे, कैलास जाधव, माजी ग्रा.प.सदस्य सौ.वंदना जाधव, पूनम सुतार, संभाजी जाधव, विजय कुंभार, आनंदा जाधव, माजी तंटामुक्ती अध्यक्ष किसन जाधव,भरत जाधव, नितीन पाटील, जगन्नाथ हारुगडे, लक्ष्मण कुंभार, मुबारक शिकलगार, लालासो हारुगडे, यांच्यासह आळसंद व परिसरातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.








