अचूक बातमी “तरुण भारत”ची; शुक्रवार 12 नोव्हेंबर, सकाळी 10.30
● नोव्हेंबर महिन्यात कोरोना आणखी आटोक्यात
● गेल्या 24 तासात 18 नवे रूग्ण वाढले
● पॉझिटिव्हीटी रेट 0.67 वर घसरला
● 2 हजार 699 संशयितांच्या चाचण्या
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यासाठी नोव्हेंबर महिना आणखी सुःखद ठरला असून सप्टेंबर, आक्टोंबरच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीच्या दहा दिवसात कोरोना रूग्णवाढ आणखी आटोक्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दहा दिवसात 296 रूग्णांची वाढ झाली असून त्या तुलनेत कोरोनामुक्तीची संख्या अधिक आहे. दिपावली सणाच्या खरेदीची गर्दी आणि सणासुदीच्या काळातील भेटीगाठी या वातावरणातही रूग्णवाढ आटोक्यात राहिली आहे. दरम्यान गेल्या 24 तासात 2 हजार 699 संशयितांच्या चाचण्या झाल्या असून 18 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. या आकडेवारीवरून जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 0.67 वर घसरला आहे.
7 नोव्हेंबरला सर्वात कमी 11 रूग्ण वाढले
जिल्ह्यात दहा दिवसात 296 रूग्णांची वाढ झाली आहे. 1 नोव्हेंबरला सर्वाधिक 50 रूग्णांची वाढ झाल्याची नोंद आहे तर 7 नोव्हेंबरला सर्वात कमी 11 रूग्णांची नोंद झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात रूग्णवाढीला चांगलाच ब्रेक लागला असून यापुढेही रूग्णवाढ आटोक्यात रहावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
19 हजार 988 संशयितांच्या चाचण्या
गेल्या दहा दिवसात कोरोना संशयितांच्या चाचण्यांची संख्याही घटली असून 19 हजार 988 संशयितांच्या चाचण्या झाल्या आहेत. 6 नोव्हेंबरला 573 संशयितांच्या चाचण्या झाल्या आहेत. गेल्या चार महिन्यातील या सर्वात कमी चाचण्या आहेत. 10 नोव्हेंबरला 3 हजार 20 चाचण्या झाल्या आहेत.
सातारा, फलटण, कराडसह आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण
सातारा जिल्ह्यातील फलटण, खटाव, कराड आणि सातारा तालुका व सातारा शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रे बळकट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या माध्यमातून युनीसेफ आणि यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 32 प्राथमिक आरोग्य केंद्रांना महिनाभरात 20 हजार N-95 मास्क, 1 हजार पिपीई किट, 2 हजार 500 लिटर सॅनिटायझर देण्यात आले आहेत.
गुरूवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 22,53,213
एकूण बाधित 2,51,442
कोरोनामुक्त 2,44,014
एकूण मृत्यू 6,454
सक्रीय रुग्ण 276
गुरूवारी जिल्हय़ात
बाधित 18
मुक्त 9
मृत्यू 00, उशिरा नोंद 04









