आनंद महिंद्रांकडून प्रचंड कौतुक
कमी साधनसामग्रीतही अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी करून दाखविणाऱया व्यक्तींचे आनंद महिंद्रा कौतुक करत असतात. यावेळी त्यांनी ट्विटरवर केलेली पोस्ट लक्ष वेधून घेणारी आहे. महिंद्रा यांनी प्रसारित केलेल्या छायाचित्रांमध्ये एका व्यक्तीने स्वतःच्या रिक्षाला एका आलिशान घरात बदलल्याचे दिसून येते.
चेन्नईत राहणारे अरुण प्रभू यांनी स्वतःच्या रिक्षाला एका घरात रुपांतरित केले आहे. यात घरासारख्या सर्व सुखसुविधा आहेत. या घरात चांगली जाग असून व्हेंटिलेशनचीही व्यवस्था आहे. यात खिडक्या आणि दरवाज्यांसह छत तसेच कपडे वाळत घालण्याचीही व्यवस्था आहे. हे एक मोबाईल घर आहे. अरुण प्रभू नावाच्या या व्यक्तीने हे घर केवळ 1 लाख रुपयांमध्ये तयार केले असून हे घरही कुठेही नेता येत असल्याचे महिंद्रा यांनी नमूद केले आहे.
या घराच्या छतावर अरुणने सौरघट बसविले असून यातून घरात विजेचा पुरवठा करण्यात येत आहे. या घरात पाण्याची साठवणूक करण्याचीही व्यवस्था आहे. अरुणने कमी जागेची शक्ती दाखविली असून यातून कोरोनाकाळात भ्रमंतीचे चाहते असलेल्या लोकांसाठी हे अनुकरणीय ठरू शकते. अरुणने बोलेरो पिकअपच्या टॉपवर असे काही केले तर मला आनंदच होईल असे उद्गार महिंद्रा यांनी काढले आहेत.









