वार्ताहर/ जमखंडी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलमट्टी येथील बंद करण्यात आलेले उद्यान सात महिन्यांनंतर 19 ऑक्टोबरपासून खुले करण्यात येणार आहे, अशी माहिती आलमट्टी धरण विभागीय अभियंते एच. सुरेश यांनी दिली. शासनाच्या मार्गसूचीप्रमाणे उद्यान उघडण्यास जिल्हाधिकाऱयांनी परवानगी दिली आहे.
कोरोनाचा फैलाव होऊ नये, यादृष्टीने 14 मार्चपासून उद्यान बंद करण्यात आले होते. मात्र 19 पासून संगीत कारंजा, लेझर प्रदर्शन, रॉक उद्यान, लव-कुश उद्यान, मोघल, इटालियन, प्रेंच उद्याने उघडण्यात येणार आहे. पर्यटकांना मास्कचा वापर बंधनकारक असून सामाजिक अंतराचे पालन सक्तीचे करण्यात आले आहे. 77 एकर परिसरात उद्यान असून येत्या डिसेंबर अखेरपर्यंत संगीत नृत्य कारंजा, एक एकरमध्ये मुलांसाठी विज्ञान पार्क व थ्रीडी प्रवेशद्वार निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली.









