दयानंद जाधव / पाचगाव
आर के नगर पाचगाव मुख्य रस्ता चांगला असताना पुन्हा या रस्त्यावर 70 लाख रुपये खर्च करून डांबरीकरण सुरू आहे . इतर अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था आहे . हे रस्ते दुरुस्त करण्याऐवजी चांगल्या रस्त्यावर सुरू असलेल्या डांबरी करणामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आर के नगर पाचगाव मुख्य रस्ता काही महिन्यांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आला आहे . या रस्त्यावर आर के नगर पासून संचयनी कॉलनी पर्यंत एक ते दोनच लहान खड्डे आहेत. पोस्टल कॉलनी जवळ रस्त्याला एक चर मारलेली आहे. एवढे सोडल्यास आर के नगरपासून संचयनी कॉलनी पर्यंत पूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा आहे. असे असताना या सुमारे 1 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी सुमारे 70 लाख रुपये खर्च करून रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे. वास्तविक दोन ते तीन ठिकाणी खड्ड्यांचे पॅच वर्क केले असते तरीही शासनाचे लाखो रुपये वाचले असते . इतर अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे .मोठे मोठे खड्डे पडले आहेत .अशा रस्त्यांचे डांबरीकरण न करता चांगल्या रस्त्यावरच सुरू असलेल्या डांबरी करणामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे . या सर्व डांबरीकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
एक किलो मीटर साठी 70 लाख रुपये खर्च
आर के नगर ते पाचगाव या चांगल्या रस्त्यासाठी 70 लाख रुपये खर्च करून डांबरीकरण सुरू आहे .चांगल्या रस्त्यावरच शासनाचे 70 लाख रुपये खर्च होणार
नागरिकांच्या घरात पाणी जाऊ नये यासाठी 70 लाख रुपयांचे डांबरीकरण खरच गरजेचे काय ?
आर के नगर ते पाचगाव हा सुमारे एक किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्ण घसरणीचा आहे . रस्त्यावरील पाणी नागरिकांच्या घरात जाऊ नये यासाठी डांबरीकरण आवश्यक असल्याचे संबंधित विभागा मधील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे . मात्र घसरणीच्या रस्त्यासाठी गटर आवश्यक असताना डांबरीकरण कोणाच्या फायद्यासाठी सुरू आहे ? असा सवाल नागरिकांमधून व्यक्त होत आहे.