वार्ताहर / पाचगाव
आर के नगर येथे सुरू असणाऱ्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत घर टू घर सर्वेक्षणात रुमाले माळ येथील एकाच कुटुंबातील 24 कोरोना पॉझिटिव रुग्ण सापडलेला परिसर ग्रामपंचायतीने सील केला असून औषध फवारणी केली आहे . या कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रकृती व्यवस्थित आहे.
आर के नगर रुमाले माळ येथे तीन भाऊ व त्यांचे कुटुंबीय असे सर्व मिळून 29 सदस्य राहतात . या कुटुंबीयांचा पुस्तक विक्री व शैक्षणिक वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय आहे . पाचगाव येथे अंगणवाडी सेविका ,आशा सेविका , आरोग्य कर्मचारी व शिक्षक यांच्यामार्फत ग्रामस्थांच्या आरोग्याचे सर्वेक्षण सुरू आहे . या सर्वेक्षण करणाऱ्या पथकाला रुमाले माळ येथील संबंधित कुटुंबातील सदस्यांना ताप , खोकला असल्याचे लक्षात आले .
त्यानंतर या पथकाने त्या कुटुंबीयांना कोरोना चाचणी करून घेण्यास सांगितले .या चाचणीमध्ये 29 व्यक्तींपैकी 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले . त्यामध्ये पाच वर्षीय, आठ वर्षीय व नऊ वर्षीय अशा एकूण तीन लहान मुलांचा देखील समावेश आहे. 8 व्यक्ती या साठ वर्षे वयावरील आहेत . तर तेरा व्यक्ती या 26 ते 60 वर्षाच्या मधील आहेत . या कुटुंबामधीलच एक व्यक्ती डॉक्टर असल्याने या कुटुंबीयांनी घरीच उपचार घेण्याचे ठरविले . या कुटुंबातील सर्व व्यक्तींची तब्येत व्यवस्थित असल्याचे समजते . पाचगाव मध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सुरू असणाऱ्या घर टू घर सर्वेक्षण करणाऱ्या पथकामुळेच एकाच कुटुंबात 24 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात आले.
पाचगाव आर के नगर परिसरात अंगणवाडी सेविका आशा सेविका, शिक्षक व आरोग्य कर्मचारी नागरिकांच्या आरोग्याचे व्यवस्थितरीत्या काळजीपूर्वक सर्वेक्षण करत असल्याचे सरपंच संग्राम पाटील यांनी सांगितले . एकाच कुटुंबात 24 सदस्य करोना पॉझिटिव्ह सापडलेल्या कुटुंबाला सर्व त्या आरोग्य सुविधा पुरवून त्या कुटुंबाची काळजी घेण्यात येत असल्याचे सरपंच पाटील यांनी सांगितले. ग्रामपंचायतीच्या वतीने रुमाले माळ परिसरात औषध फवारणी करून रस्ता सील केला आहे. पाचगावचे सरपंच संग्राम पाटील व उपसरपंच विष्णू डवरी यांनी ग्रामस्थांनी घाबरून न जाता आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी ,सर्वांनी मास्क वापरावा असे आवाहन केले आहे.
चोवीस पॉझिटिव्ह रुग्णांपैकी आठ रुग्ण 60 वर्षावरील तर दहा वर्षाखालील तीन मुलांचा कोरोना पॉझिटिव अहवाल आला आहे. 26 ते 60 वयोगटातील 13 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आहेत .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









