वार्ताहर / पाचगाव
पाचगाव, आर के नगर परिसरातील पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरातील सर्वांचे रिपोर्ट रविवारी संध्याकाळी निगेटिव आले. यामुळे रुमाले माळ परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
15 जुलै रोजी आर के नगर रुमाले माळ येथील एका 35 वर्षीय युवकाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता. त्यानंतर त्याच्या घरातील 8 सदस्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्या सर्वांचे रिपोर्ट रविवारी संध्याकाळी निगेटिव्ह आले. पाचगावमध्ये आज पर्यंत एकूण दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत .
Previous Articleबामणीत तरूणी कोरोना पॉझिटिव्ह
Next Article कोल्हापूर : तिळवणीत एका युवकास कोरोनाची लागण








