वार्ताहर/किणये
महाराष्ट्र एकीकरण समिती ग्रामीणचे अधिकृत उमेदवार आर.एम.चौगुले यांना किणये-रणकुंडये गावांतून पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी या दोन्ही गावात चौगुले यांची प्रचारफेरी काढण्यात आली. या फेरीत परिसरातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किणये गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन आर. एम. चौगुले यांनी घेतले. त्यानंतर संपूर्ण गावभर प्रचार मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अनेक महिला चौगुले यांचे आरती ओवाळून स्वागत करीत होत्या. किणये गावातील तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रमुख नेतेमंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रणकुंडये गावात आर. एम. चौगुले यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन आर. एम. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. रणकुंडये गावातील अनेक कार्यकर्त्यांनी चौगुले यांना अधिकाधिक मते देऊन निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. याप्रसंगी कार्यकर्ते हजर होते.









