प्रतिनिधी / सांगली
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे बंधु सुरेश पाटील व सुपुत्र रोहित पाटील यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
सध्या या दोघांची ही तब्येत चांगली आहे. ते दोघेही वैद्यकीय उपचार घेत असून क्वारंटाईन ही झाले आहेत.
आर.आर पाटील यांच्या कुटुंबातील सर्वांनी कोरोना चाचणी केली असुन. आमदार सुमनताई पाटील यांची निगेटिव्ह आली आहे, तर सुपुत्र रोहित पाटील आणि बंधु सुरेश पाटील या दोघांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. याबरोबरच दरम्यानच्या टप्यात या दोघांच्या संपर्कात आलेल्यांना चाचण्या करुन घ्याव्यात असे अवाहन ही करण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








