सॉफ्ट बँक समूहातील चिप कंपनी : 2.93 लाख कोटींना व्यवहार शक्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सॉफ्टबँक समूहातील कॉर्पची ब्रिटीश चिप डिझायनर कंपनी आर्म होल्डिंगची लवकरच निविडिया कंपनी खरेदी करण्याचे संकेत आहेत. सदरचा हा व्यवहार जवळपास 2.93 लाख कोटी रुपयांना होण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने नुकत्याच सादर केलेल्या अहवालामधून ही माहिती देण्यात आली आहे. तसेच हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर निविडिया चिप उद्योगातील दिग्गज कंपनी होण्याचीही माहिती आहे.
या दोन्ही कंपन्यांमधील क्यवहार हा शक्मयतो रोख आणि स्टॉकच्या आधारे होणार असल्याचेही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीतून कळते आहे. निविडिया व्हीडीओ गेम्ससाठी ग्राफिक्स चिपची निर्मिती करत आहे. याच्यासह कंपनी आर्टिफिशिअल इंटेलीजेन्स (एआय), सेल्फ ड्रायव्हींग कार आणि डाटा केंद्रासाठीही चिप निर्मिती करण्यात कार्यरत असल्याची माहिती आहे.
सॉफ्टबँक समूहाकडून खरेदी
जपानच्या सॉफ्टबँकेच्या ग्रुप कॉर्पने 2016 मध्ये आर्म होल्डिंगची खरेदी केली होती. ही खरेदी 32 अब्ज डॉलर्समध्ये करण्यात आली होती. हा त्यावेळचा सर्वात मोठा व्यवहार असल्याचे म्हटले जात होते. सॉफ्टबँकेच्या समूहाने आपल्या इंटरनेट व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी या कंपनीची खरेदी केली होती.









