बाकू
आर्मेनिया आणि अजरबैजान यांच्यात जमिनीच्या एका तुकडय़ावरून भीषण युद्ध सुरू झाले आहे. दोन्ही देशांनी परस्परांच्या विरोधात युद्धाची घोषणा करत स्वतःचे सैनिक सीमेवर आणले आहेत. आर्मेनियाने स्वतःच्या देशात मार्शल लॉ लागू केला आहे. तसेच अजरबैजानची दोन हेलिकॉप्टर्स पाडविल्याचा दावा केला आहे. दोन्ही देश 4,400 चौरस किलोमीटरमध्ये फैलावलेल्या नागोर्नो-काराबाख नावाच्या हिस्स्यावर कब्जा इच्छितात. नागोर्नो-काराबाख भाग आंतरराष्ट्रीय स्वरुपात अजरबैजानचा भाग आहे, परंतु त्यावर आर्मेनियाच्या वांशिक गटांचा कब्जा आहे.









