ऑनलाइन टीम / मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यावर देशासमोर अर्थव्यवस्थेवरील विपरीत परिणाम व बेरोजगारीचे संकट उभे राहील. या संकटाला कसे तोंड द्यायचे, यासाठी आत्तापासूनच विचार करायला पाहिजे.असा सल्ला राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेता शरद पवार यांनी दिला आहे.
पवार यांनी आज फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना आर्थिक पॅकेज देण्याची गरज आहे. तसेच शेतीला बळ देत मार्गदर्शन ही केले पाहिजे. गहू, तांदळाचं पिक घेण्याची वेळ आली आहे. ही पिकं वेळेवर काढले नाहीत तर शेती अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल असेही पवार यावेळी म्हणाले.
तसंच यावर्षी महावीर जयंती, शब्बे – बारात घरातच करा. मुस्लिम बांधवांनी घरातच पूर्वजांचे स्मरण करा. महात्मा फुले जयंतीला ज्ञानदीप लावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संविधानाचा दिवा लावून साजरी करूया, गर्दी टाळूया, अंतर राखूया असे आवाहन यावेळी पवार यांनी जनतेला केले.









