प्रतिनिधी / चिपळूण
लॉकडाऊनमध्ये तीन लाख रुपये हडप केल्याचा आरोप करत कामगारास बेदम मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी चिपळूण शहरातील शिवनदी परिसरात घडला. या प्रकरणी 12जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्याचे कपडे काढून त्याच्या तोंडात मिरची, आले भरुन अमानुषपणे ही मारहाण करण्यात आली. यात कामगार गंभीर जखमी झाला आहे.
सुरज विनायक मोरे (24), अलोक उदय चव्हाण (25, दोघेही काविळतळी ) अशी अटक केलेल्यांची नावे असून दीपक दत्ताराम लटके ( 38, पागझरी ) असे मारहाण झालेल्याचे नाव आहे. तीन लाख रुपये किंमतीचे बिअर बॉक्स विकून करुन घेतला. असा प्रकार आपण केला नसल्याचे लटके सांगितले. तरीही लटके कबुली देत नाहीत म्हणून मंगळवारी सकाळी 10.15 वाजता ते कामावर जाण्यासाठी आले असता हा प्रकार घडला.
Previous Articleदेवेंद्र फडणवीस यांच्यावर आता ‘ही’ जबाबदारी
Next Article चिपळुणात गुरे वाहतूक करणारा कंटेनर पकडला









