कोविड-19 च्या वाढत्या संकटामुळे अनुमान घटविले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणूने साऱया जगात मोठय़ा प्रमाणात थैमान घातले आहे. आणि याचा परिणाम म्हणून जगाची आर्थिक चाक थांबली आहेत. तशीच स्थिती भारताचीही झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आशियाई विकास बँकेकडून (एडीबी) आर्थिक वर्ष 2021 मध्ये भारताचा आर्थिक विकासदर घटून चार टक्क्मयावर राहणार असल्याचे अनुमान मांडले आहे. मागील वर्षात शेअर बाजार व अन्य क्षेत्रातील खराब कामगिरीमुळे देशाचा विकासदर प्रभावीत होत घसरण नोंदवली जात असे. यामुळे मंदीचे काहीसे वातावरण तयार होत होते.
आर्थिक वर्ष 2019मध्ये हा विकासदर 6.1 टक्क्मयांनी घसरुन 5 टक्क्मयांवर राहिला होता. एडीबीचे अध्यक्ष मसात्सुगु असकाकावा यांनी म्हटले आहे, की काही वेळा विविध संकटाचा सामना करावा लागतो. तसेच कोविड19 मुळे संपूर्ण जग भीतीच्या छायेखाली आले आहे. याचा परिणाम आगामी वर्षात अर्थव्यवस्थेवर होणार असल्याचे संकेत व्यक्त केले आहेत. एडीबीने 2020मध्ये भारताचे देशातील सरासरी उत्पादनाचा वेग आगामी आर्थिक वर्षात मजबूत होण्याअगोदरच ते अनुमान घटविले आहे.









