ऑनलाईन टीम / पुणे :
आर्ट मॅजिक क्लासेसच्या वतीने १४ वे आर्ट मॅजिक कलाप्रदर्शनाचे बालगंधर्व कलादालन येथे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १७ ते १९ मार्च दरम्यान सकाळी ११ ते ८ या वेळेत प्रदर्शन भरविले जाणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते १७ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.
या वेळी प्रसिद्ध चित्रकार उल्हास वेदपाठक,ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार उपस्थित राहणार आहेत. चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन आर्ट मॅजिकच्या संचालिका डॉ. महालक्ष्मी पवार आणि संयोजक अंबादास पवार यांनी केले आहे.
महालक्ष्मी पवार म्हणाल्या, या प्रदर्शनामध्ये ऑइल, अॅक्रेलिक, कलर पेन्सिल,चारकोल, पोट्रेट या माध्यमातील विविध चित्रांचा समावेश करण्यात आला आहे. चित्रकारांमध्ये विविध वयोगटातील मुलांचा समावेश आहे.
यावर्षी या संस्थेच्या संस्थापिका महालक्ष्मी पवार यांना कलाश्री अवॉर्ड,तसेच नॅशनल ऑनलाईन वॉटर कलर स्पर्धेमध्ये ५० एक्सलंट आर्टिस्टमध्ये पुरस्कार मिळाला. इंटरनॅशनल चित्रप्रदर्शनात हायली रेकमेंडेशन अॅवॉर्ड मिळाला आहे. तसेच कर्नाटकमधील डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम संस्थेद्वारा मेरिट अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.








