ऑनलाईन टीम / मुंबई :
सामाजिक उत्तरदायित्वाच्या परिपूर्तीसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने 21फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर जी यांच्या संकल्पेतून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद म्हणून हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
नवी मुंबई व पनवेल परिसरातील एकूण 6 ठिकाणी हे रक्तदान शिबिर होणार आहे. सकाळी 9 ते 2 या वेळेत घणसोली, वाशी, नेरुळ, खारघर, पनवेल आणि नवीन पनवेल या ठिकाणी हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
मानवतावादी सेवेला योगदान देण्यासाठी इच्छुकांनी https://tiny.cc/21FebDonateBlood या लिंकवर क्लिक करून नाव नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
- या ठिकाणी होणार शिबिर :
- साईबाबा मंदिर सेक्टर – 12 घणसोली बस डेपोसमोर घणसोली.
- वाशी ज्ञानमंदिर 177 पहिला मजला सतरा प्लाझा पाम बीच रोड सेक्टर – 19 डी.
- रामाश्रे सोसायटी प्लॉट 21 सेक्टर 19 नेरुळ पूर्व डी मार्टच्या समोर नेरुळ.
- खारघर क्लब हाऊस अधिराज गार्डन सेक्टर – 5.
- आराध्याम आयुर्वेदिक चिकित्सलय पहिला मजला मंगलमूर्ती कृपा परेडश अली महाराणा प्रताप रोड पनवेल.
- भुसारे वृद्धाश्रम सिडको कार्यालयासमोर सेक्टर – 1 नवीन पनवेल.