जि. प.सदस्य राजन मुळीक यांनी केले उद्घाटन; १० हजाराचा धनादेशही केला सुपूर्द
सावंतवाडी/ प्रतिनिधी-
गिरोबा विद्यालय आरोस येथे ग्राम विलगिकरण कक्षाचे जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या वेळी आरोस गावचे सरपंच शंकर नाईक सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्यसेविका, शिक्षक, पोलीस पाटील, आशाताई, अंगणवाडी सेविका, सीआरपी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. विलगिकरण कक्षामध्ये टेलिव्हिजन, इंटरनेटची सोय करण्यात आली आहे.
जि. प. सदस्य राजन मुळीक यांनी विलगिकरण कक्षासाठी 10000 चा धनादेश दिला तर आरोस गावचे अमर घोगळे यांनी 2ऑक्सिजन पोर्टेबल कॅनची सोय केली आहे.









