सर्व्हेतूनच कोरोनाचा प्रसार होण्याची भीती
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून माझं कुटूंब माझी जबाबदारी हे अभियान दि.15सप्टेंबर पासून राज्यभरात सुरू झाले आहे.वरिष्ठ पातळीवर हे अभियान चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी सूचना दिल्या गेल्या.मात्र, निव्वळ कागदावर रकाने भरले गेले आहेत.असा प्रकार सध्या दिसून येत आहे.जिह्यात 1500 गावं आणि 10 शहर आहेत.नेमलेली पथक कुठं सर्व्हे करतात हेच दिसतं नाही.कागदोपत्री मात्र 31 लाख 55 हजार 956 लोकांपैकी 29 लाख25 हजार 296 नागरिकांची तपासणी केल्याचे सांगण्यात येते.93 टक्के तपासणी झाल्याचा दावा जिल्हा प्रशासन करत आहे.
सातारा जिह्यात सध्या ब्रयापैकी ग्रामीण भागात दुपारी कोणीही घरी आढळून येणार नाही.शेतात सुगीचा हंगाम सुरू असल्याने अख्खा गाव शिवारात असतो.शहरी भागात दिवसा अन लॉक असल्याने कोणी घरात सापडत नाही.प्रशासनाने नेमलेल्या 974 पथकास ही तपासणीची जबाबदारी दिली आहे.सुरुवातीला आशांनी संप केला.गुरुजींच्यावर जबाबदारी दिली.गुरुजींनी घरातून शाळा केली.शहरी भागात सर्व्हे करायला सामाजिक संस्थांकडे जबाबदारी दिली.मग काय नुसतीच कागदे रंगवली जाऊ लागली बघता बघता सर्व्हे पूर्ण झाला.प्रत्यक्षात दहा माणसापैकी तीनच माणस सांगता की आमच्या घरी पथक आले होते, असे सांगतात.ग्रामीण भागात तर पथक कुठे फिरकले ही नाही.त्यामुळे माझी कुटूंब माझी जबाबदारीचा नुसताच गोल माल आहे.
सातारा जिह्यात आरोग्य विभागाकडे असलेल्या आकडेवारीत जावलीत 1 लाख 9 हजार 288 लोकांपैकी 1 लाख 83 जणांची 37 पथकाद्वारे 92 टक्के तपासणी झाली.कराड तालुक्यातील 6 लाख 416 लोकांपैकी 5 लाख 58 हजार 415 लोकांची 167 पथकाद्वारे तपासणी करण्यात आली.खंडाळा तालुक्यातील 1 लाख 43 हजार 68 हजार लोकांपैकी 1 लाख 51 हजार 336 लोकांची 45 पथकाद्वारे तपासणी करण्यात आली.खटाव तालुक्यातील 2 लाख 96 हजार 310 लोकांपैकी 92 पथकाद्वारे 2 लाख 89 हजार 224 जणांची तपासणी केली आहे.कोरेगाव तालुक्यातील 2 लाख 52 हजार 551 लोकांपैकी 86 पथकाद्वारे 2 लाख 29 हजार 431 जणांचा सर्व्हे करण्यात आला.महाबळेश्वरमध्ये 67 हजार 558 जणांपैकी 22 पथकाद्वारे 57 हजार 563 जणांची तपासणी केली.माण तालुक्यातील 2 लाख 34 हजार 510 लोकांपैकी 80 पथकाद्वारे 2 लाख 35 हजार 992 लोकांची तपासणी करण्यात आली.पाटण तालुक्यातील 3 लाख 20 हजार 241 लोकांपैकी 90 पथकाद्वारे 2 लाख 87 हजार 584 जणांची तपासणी करण्यात आली.फलटण तालुक्यातील 3लाख 66 हजार395 जणांपैकी 119 पथकाद्वारे 3 लाख 6 हजार 885 जणांची तपासणी करण्यात आली.सातारा तालुक्यातील 5 लाख 60 हजार 245 जणांपैकी 163 पथकाद्वारे 5 लाख 25 हजार 259 जणांची तपासणी करण्यात आली.वाई तालुक्यातील 2 लाख 5हजार374 जणांपैकी 73 पथकाद्वारे 1 लाख 83 हजार 524 जणांची तपासणी करण्यात आली.अशी एकूण जिह्यातील 31 लाख 55 हजार 956 जणांपैकी 974 पथकाद्वारे 29 लाख 25 हजार 296 जणांची तपासणी करण्यात आली, असल्याची आकडेवारी जिल्हा आरोग्य विभागाकडे आहे.
आमच्याकडे कोणीही सर्व्हेला आले नव्हते
मी सदरबाजार परिसरात राहतो. माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेत कोणी आमच्या परिसरात तपासायला आले नाही.हा घरोघरी जाऊन सर्व्हे करायचा असतो ना.कोणा कोणाची तपासणी झाली?,जिह्यात जर 93 टक्के सर्व्हे झाला असेल तर नक्की कसा सर्व्हे झाला ते ही प्रशासनाने जाहीर करावे.
विकास गोसावी शहराध्यक्ष
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली
सांगण्यास खेद वाटतो आहे.आमच्या प्रभागात तर आशा सेविका, अंगणवाडी सेविका किंवा पालिकेचे कोणतेही अधिकारी आल्याचे मला तर दिसले नाही.ह्यांनी कोणाचा सर्व्हे केला.घरात बसून कागदे रंगवली काय?,मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माझे कुटूंब माझी जबाबदारीचा सर्व्हेबाबत तक्रार केली आहे.
बाळासाहेब शिंदे शिवसेना शहर प्रमुख
कोरोनाच्या भीतीने शिक्षक करताहेत ऑन लाईनच सर्व्हे
कोरोना कसा कधी होईल याचा नियम नाही.अगदी ऑक्सीमीटर दिलेला सगळ्यांना सनिटायझर करून वापरावा लागत आहे.त्यातून ही कोरोना होण्याची भीती असल्याने काही शिक्षकांनी गुगलचा ऑन लाईन फॉर्म तयार करून तो फॉर्म गावागावात भरून घेतला जात आहे.त्यामुळे ग्रास रूटला पथक हे दिसत नाही, असे शासकीय अधिकायांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.








