प्रतिनिधी / शाहूवाडी
कोरोना प्रतिबंध उपायासाठी एक विशेष ॲक्शन प्लॅन तयार करून तालुक्यात यापुढे बाहेरून येणार्या नागरिकांची कसून चौकशी करावी. त्यासाठी लागणारी आवश्यक यंत्रणा प्रशासनाने सज्ज ठेवावी, अशी सूचना करतानाच आरोग्य विभागासाठी लागणारे साहित्य त्वरित मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली. शाहूवाडी येथे आज आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते.
खासदार धैर्यशील माने यांनी कोरोना प्रतिबंध उपाययोजना व आढावा बैठक शाहूवाडी पंचायत समिती येथे आयोजित केली होती. वेळी माजी आमदार सत्यजित पाटील, बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील, सभापती सुनीता पारळे, उपसभापती विजय खोत, तहसीलदार गुरु बिराजदार, गट विकास अधिकारी अनिल वाघमारे, सपोनि भालचंद्र देशमुख मलकापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी शीला पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती
आतापर्यंत जी सतर्कता ठेवली त्यामुळे तालुक्यातील स्थिती अतिशय चांगली असून प्रशासनाचे याबद्दल अभिनंदन आहे. मात्र यापुढेही लोकांनीही अशाच पद्धतीने सहकार्य करणे अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधींनीही विविध ठिकाणी लक्ष देऊन या संकटाचा धैर्याने सामना करुया. कोरोना आपत्ती निवारणासाठी आवश्यक बाबी आहेत. त्या त्वरित मिळवून देण्यासाठी मी विशेष प्रयत्न करत असून त्या उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही खासदार माने यांनी दिली.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








