सावंतवाडी / वार्ताहर-
भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि सावंतवाडीचे नगराध्यक्ष परब यांनी आरोग्य विभागाच्या विरोधात केलेले आंदोलन म्हणजे आपले अपयश लपवण्याचा प्रकार आहे भाजपने कोविड काळामध्ये कोविड केंद्र, विलगीकरण कक्ष व ऑक्सीजन कोविड सेंटर उभारण्याच्या घोषणा केल्या. आता नागरिक चर्चा करू लागले त्यामुळे त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रकार आंदोलनातून करत असल्याची टीका शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली आहे.
शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ म्हणाले, सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात भाजपाचे जिल्हाध्यक्ष तेली व नगराध्यक्ष परब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालेले हे आपले अपयश लपवण्याचा प्रकार आहे जनतेची दिशाभूल ते करत आहेत दुसऱ्या लाटेत तेली किंवा परब यांनी लोकांच्यासाठी कोणत्याही प्रकारची कामगिरी केली नाही त्यामुळे हे आंदोलन आहे









