प्रतिनिधी / इस्लामपूर
भविष्यात आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी लागेल. येत्या आठ दिवसात आरोग्य विभागाकडील १७ हजार रिक्त जागा मेरिट पध्दतीने भरण्यात येतील. कोरोना पार्श्वभूमीवर कमी खर्चात दुरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले असून खाजगी डॉक्टरांना ५० लाखांपर्यत विमा कवच मिळणार आहे. मास्क, सॅनिटायझर माफक दरात देण्याचा निर्णय लवकरच होईल. महाविकास आघाडीचे सरकार लोकहिताची जपणूक करण्यासाठी कटीबध्द आहे. असा विश्वास राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी येथे व्यक्त केला.
टाटा ट्रस्टच्या सहयोगाने येथील उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या अद्ययावत कोव्हिड हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळयानंतर राजारामबापू नाटयगृहात झालेल्या समारंभात उदघाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे होते. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आ.मानसिंगराव नाईक, आ.सदाभाऊ खोत, खा.धैर्यशील माने, माजी आ.सदाशिवराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी, जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांची प्रमुख उपस्थित होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








