ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आरोग्य खात्याच्या बजेटमध्ये 137 टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून, हे बजेट 2.32 हजार कोटींचे असेल. मागील वर्षी हे बजेट 92 हजार कोटींचे होते. या बजेटमध्ये कोरोना लसीकरणासाठी 35 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
देशात प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना लॉन्च करण्यात येणार असून, 6 वर्षात त्याच्यावर 64,180 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
याशिवाय 17 नवीन आरोग्य योजनांसह देशात 75 हजार ग्रामीण आरोग्य केंद्र, सर्वच जिल्ह्यात तपासणी केंद्र, 602 जिल्ह्यांमध्ये क्रिटीकल केअर हॉस्पीटल ब्लॉक होणार आहेत, नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल, इंटिग्रेटेड हेल्थ इन्फोपोर्टलला अधिक मजबूत करण्यात येईल, असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले.









