सांगली/प्रतिनिधी
बुधगाव ता. मिरज येथे 56 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेले आरोग्य उपकेंद्र तातडीने सुरू करा अन्यथा जिल्हा आरोग्य अधिकार्यांच्या सांगली जिल्हा परिषदेमधील कार्यालयाला टाळे ठोकले जाईल. असा इशारा भाजप नेते आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती विक्रम पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
सध्या बुधगाव मध्ये छोट्या-मोठ्या आजारानी लोक त्रस्त आहेत. बुधगाव च्या लोकांना कवलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून राहावे लागते. त्यासाठी उपकेंद्र सुरू करण्याची आवश्यकता आहे, असे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच आरोग्य उपकेंद्र तातडीने सुरू केले नाही तर डीएचओ कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा यावेळी विक्रम पाटील यांनी दिला आहे.








