बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. राज्यात मंगळवारी आणि बुधवारी कोरोना रुग्णांची संख्या २ हजारच्या वर गेली आहे. राज्यात वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेता सरकारला लॉकडाउन करण्यास भाग पाडले, असे राज्याचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी म्हंटले आहे. ते बुधवारी जागतिक टीबी डे कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर सुधाकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे संकेत दिले. बुधवारी राज्यात सुमारे २,२९८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, गेल्या चार महिन्यांत एका दिवसात सर्वाधिक रुग्ण वाढ झाली आहे.
बर्याच राज्यांना मर्यादित किंवा पूर्ण लॉकडाऊन लागू करण्यास भाग पाडले आहे. मंत्री सुधाकर यांनी कोरोनाची दुसरी लाट येऊनही लोक काळजी घेत नाहीत. नागरिक मास्क आणि सामाजिक अंतर नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे बऱ्याच राज्यांना मर्यादित किंवा पूर्ण लॉकडाऊन लागू करण्यास भाग पाडले आहे. हे टाळण्यासाठी लोकांना सरकारचे समर्थन करावे लागेल. तसेच कोरोना नियमांचे पालन करावे लागेल.