ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे घेण्यास सुरूवात केली आहे. आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्यासह नऊ मंत्र्यांनी आतापर्यंत राजीनामे दिले आहेत.
आरोग्यंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, शिक्षण राज्यमंत्री आणि अकोल्याचे खासदार संजय धोत्रे, पश्चिम बंगालमधील मंत्री देवश्री चौधरी यांच्यासह केंद्रीय रसायने व खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा, कामगार मंत्री संतोष गंगवार, रावसाहेब दानवे, रतनलाल कटारिया, प्रताप सारंगी यांनीही केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे.









