नवी दिल्ली प्रतिनिधी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत सर्व वैद्यकीय सुविधा आणि डॉक्टरांची डिजिटल नोंदणी सुरू केली आहे. राज्य सचिव आणि आरोग्य मिशनच्या संचालकांना लिहिलेल्या पत्रात, आरोग्य मंत्रालयाने आपल्या सर्व आरोग्य सुविधांना मिशनमध्ये सहभागी होणे अनिवार्य केले आहे.
उपक्रमानुसार, सर्व आरोग्य सुविधा जसे रुग्णालय, दवाखाने, प्रयोगशाळा, फार्मसी, रेडिओलॉजी सेंटर इत्यादी, जिथे कोणतीही आरोग्य सेवा प्रदान केली जाते, त्यांना डिजिटल मिशनसाठी नोंदणी करण्यास सांगितले आहे. आरोग्य नोंदणी अभियानाच्या डिजिटलायझेशन अंतर्गत, सरकारी रुग्णालयांना रुग्णालय माहिती, व्यवस्थापन प्रणाली, सॉफ्टवेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
केंद्राने रुग्णालयांसाठी आरोग्य नोंदींच्या डिजिटलायझेशनसाठी दोन उपाय उपलब्ध केले आहेत त्यानुसार (नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर) द्वारे ई-हॉस्पिटल्स आणि C-DAC (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग) द्वारे ई-सुश्रुत
या दोन डेटाबेसवर आरोग्य विभागाचा डेटा साठवला जाणार आहे